बांदा : बांदा ग्रामपंचायतीचे प्रभाग क्रमांक २ चे क्रियाशील सदस्य तथा माजी उपसरपंच जावेद खतीब यांनी सामाजिक बांधिलकी जपत उभा बाजार, आळवाड आणि मोर्येवाडी येथील अंगणवाडीसाठी स्वखर्चातून विविध आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. यामध्ये अंगणवाडीच्या शौचालयासाठी नवीन दरवाजा बसवून देण्यात आला. तसेच अंगणवाडी सेविका सावंत मॅडम यांच्याकडे चार पायपुसण्या, दोन चटया आणि लाईटचे बल्ब सुपूर्द करण्यात आले. या उपक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुलांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण मिळण्यास मदत होणार आहे.

यावेळी यतीन धामापूरकर, प्रवीण नाटेकर, सूरज धामापूरकर, सुनील धामापूरकर, ऋषी हरमलकर, मंदार धामापूरकर, आप्पा धामापूरकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

जावेद खतीब यांनी सामाजिक जाणिवेतून केलेल्या या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी आणि मान्यवरांनी मनापासून कौतुक करत त्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून, सामाजिक उत्तरदायित्वाचे हे अनुकरणीय उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.



