सावंतवाडी : येथे तब्बल गेली दोन दशके गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह आरोग्यसेवा देत रुग्णांच्या सेवेत कार्यरत असलेल्या यशराज मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलचा २१ वा वर्धापन दिन उद्या बुधवार, दिनांक २२ जुलै रोजी उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्ताने “आई टेस्ट ट्यूब बेबी सेंटर” येथे कोकण विभागात प्रथमच अत्याधुनिक GE Voluson Performance 18 ही जागतिक दर्जाची AI-सहाय्यित 3D/4D कलर डॉप्लर सोनोग्राफी प्रणाली रुग्णसेवेसाठी कार्यान्वित करण्यात येणार आहे.
या आधुनिक यंत्रणेमध्ये ५ प्रोब्स, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित तंत्रज्ञान आणि उच्च दर्जाची निदान क्षमता उपलब्ध असून, स्त्रीरोग, गर्भधारणा आणि भ्रूण तपासणी अधिक अचूक व परिणामकारक होणार आहे. तसेच अखंडित रुग्णसेवा आणि IVF बॅकअपसाठी GE Versana Ess R2 A1 Sure ही स्वतंत्र बॅकअप सोनोग्राफी प्रणालीदेखील सुरू करण्यात येणार आहे.

यशराज हॉस्पिटलने तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, समर्पित कर्मचारीवृंद आणि रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा यांच्या बळावर आरोग्यसेवेत वेगळी ओळख निर्माण केली आहे. याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत सेवा सुरू करून सर्वसामान्यांना सुलभ व परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण टप्पाही हॉस्पिटलने गाठला आहे.
या शुभदिनी डॉ. राजेश नवांगुळ यांच्या वाढदिवसानिमित्त श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २२ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून यशराज हॉस्पिटल येथे होणार असून, सर्व मान्यवर, हितचिंतक, मित्रपरिवार व नागरिकांनी सपरिवार उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन डॉ. राजेश नवांगुळ, डॉ. सुधाकर नवांगुळ, डॉ. यश नवांगुळ, सौ. सुनीला नवांगुळ, सौ. मनीषा नवांगुळ तसेच समस्त यशराज हॉस्पिटल परिवार यांनी केले आहे.



