बातमी अत्यंत कामाची. – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३६५ ग्रामपंचायती व ३ नगरपरिषदांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ आयडीसाठी अर्ज मागविले.

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील रिक्त असलेल्या **३६५ ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये तसेच ३ नगरपरिषद/नगरपंचायत क्षेत्रांमध्ये नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्र (Aaple Sarkar Seva Kendra)’ आयडी प्रदान करण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दि. २९ जुलै २०२६ ते ७ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अर्ज स्वीकारण्याची वेळ सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० अशी असून अर्ज केवळ कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी स्वीकारले जाणार आहेत.

वेळापत्रक –

जाहिरात प्रसिद्ध : २३ जुलै २०२६

ऑनलाईन अर्ज स्वीकारणे : २९ जुलै ते ७ ऑगस्ट २०२६

प्राप्त अर्जांची माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध : २० ऑगस्ट २०२६

हरकती व अपात्र अर्जांची छाननी : १ सप्टेंबर २०२६

एकापेक्षा अधिक अर्ज असल्यास मुलाखत : तारीख स्वतंत्रपणे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

अंतिम निवड यादी : अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, अर्जाचा नमुना, पात्रता, अटी-शर्ती, आवश्यक कागदपत्रे तसेच इतर सर्व माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना फोन, ई-मेल किंवा अन्य माध्यमातून स्वतंत्र माहिती दिली जाणार नसून सर्व सूचना व अद्ययावत माहिती केवळ अधिकृत संकेतस्थळावरच प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे अर्जदारांनी संकेतस्थळ नियमितपणे पाहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles