मिलाग्रीस प्रशालेत ‘एक पेड माँ के नाम’ ‘3.0’ अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न.

सावंतवाडी:  पर्यावरण संवर्धनाचा आणि मातृप्रेमाचा अनोखा संदेश देत मिलाग्रीस प्रशालेमध्ये नुकताच ‘एक पेड माँ के नाम’ 3.0 या अभियानांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रशालेच्या सुपरवायझर संध्या टीचर यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेतील इको क्लबच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.या मोहिमेत इको क्लबचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्साहाने सहभाग नोंदवला.
आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण: ‘एक पेड माँ के नाम’ या भावनिक संकल्पनेला अनुसरून उपस्थित विद्यार्थी आणि शिक्षकांनी आपल्या आईच्या सन्मानार्थ वृक्षारोपण केले आणि त्या रोपांची भविष्यात काळजी घेण्याची व संवर्धन करण्याची शपथ घेतली.
याप्रसंगी मुख्याध्यापक रेव्ह. फादर रिचर्ड सालदान्हा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना निसर्गाचे रक्षण आणि आजच्या काळात झाडे लावण्याचे महत्त्व पटवून दिले.
सुपरवायझर संध्या टीचर यांनी या उपक्रमात हिरिरीने सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे आणि इको क्लबच्या शिक्षकांचे विशेष कौतुक केले. हा वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशालेतील सर्व कर्मचारी व इको क्लबच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांमध्ये निसर्गाविषयी प्रेम आणि आईविषयी कृतज्ञतेची भावना निर्माण करणाऱ्या या उपक्रमाचे परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles