समर्थ दासबोध ‘AI’ जगाच्या पाठीवर संत वाङ्मयातील क्रांतिकारी घटना! : डॉ. विजय लाड.

वैभववाडी : दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवारातील अमेरिकेत राहत असलेले सौ. अवनी आणि श्री ओंकार सबनीस यांनी विश्वाच्या पाठीवर रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील ए आय हे व्यासपीठ तयार केले,. त्याचे आज गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर लोकार्पण झाले. समर्थ रामदास स्वामींच्या दासबोध ग्रंथातील व्यवहार, परमार्थ, प्रयत्नवाद, संघटन कौशल्य, लेखन, वक्तृत्व, अर्थव्यवस्थापन अशा अनेक विषयांवर प्रश्न विचारले असता दासबोधातील ओव्या आणि त्यांचा इंग्रजी तसेच मराठी अर्थ उपलब्ध होतो. दासबोध ए आय ही जगातल्या तरुण पिढीसाठी एक मोठी उपलब्धी आहे असे विचार दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशनचे संचालक डॉ. विजय लाड यांनी या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी व्यक्त केले. दासबोध एआय (https://dasbodh-ai.org/ ) ही जगातली एक क्रांतिकारी घटना होय असे मत श्री समर्थ सेवा मंडळाचे कार्यवाह योगेश बुवा पुरोहित तसेच श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगडचे अध्यक्ष भूषण स्वामी यांनी समाजाच्या आणि देशाच्या उन्नयनासाठी तरुण पिढीने याचा वापर केला पाहिजे असे मत व्यक्त केले.

समर्थ दासबोध ए आय ( https://dasbodh-ai.org/ )
या व्यासपीठाच्या ऑनलाइन लोकार्पण सोहळ्यासाठी देशातील अनेक समर्थ भक्त आणि समर्थ वाङ्मयाचा अभ्यास करणारे संशोधक उपस्थित होते.

या ऑनलाईन प्रकाशन सोहळ्यासाठी आनंद जोगळेकर, विवेक सबनीस, सौ. मुग्धा महाबळेश्वरकर, सौ. मंजिरी सबनीस यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles