वेंगुर्ला : भाजपाच्या वतीने वेंगुर्लेत तालुका कार्यालयात आज ‘मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे’ फाॅर्म वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी बार्टी संस्थेचे समतादूत सुहास मोचेमाडकर यांनी फाॅर्म भरण्यासंदर्भात माहिती दिली. यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले कि, ६५ वर्षांवरील किंवा त्यावरील वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना वयोमानापरत्वे येणारे अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करण्यासाठी, तसेच मनस्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र याद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी शासनाने राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबवीण्यास सुरुवात केली आहे. या योजनेद्वारे नागरीकांना ३००० रु. शासनाकडून दिले जाणार आहेत , त्यामुळे पात्र वृद्धांना सहाय्य साधने – उपकरणे खरेदी करता येतील . काही वृद्ध निराधार असतात , त्यांना वृद्धापकाळात आवश्यक असलेले साहीत्य उदा.चष्मा , ट्रायपॉड , कंबरे संबंधीचा पट्टा , फिल्डींग वाॅकर , ग्रीवा काॅलर , स्टिंक व्हीलचेअर , कमोड खुर्ची , गुडघा ब्रेस , श्रवणयंत्र इत्यादी वस्तु खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत मिळत नाही . त्यामुळेच महायुती सरकार ने ही योजना सुरु केल्याची सांगीतले . तसेच तालुक्यातील ६५ वर्षावरील जास्तीत जास्त जेष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

यावेळी ह.भ.प.सावळाराम कुर्ले बुवांना फाॅर्म देऊन वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जि.का.का.सदस्य मनवेल फर्नांडिस व वसंत तांडेल, महिला मोर्चाच्या वृंदा मोर्डेकर, सरपंच संघटनेचे विष्णु उर्फ पपु परब, ओबीसी सेलचे शरद मेस्त्री, ता.का.का.सदस्य आनंद ऊर्फ बिट्टु गावडे, बुथ प्रमुख पुंडलिक हळदणकर व नारायण गावडे, किशोर रेवणकर, कार्यालय प्रमुख छोटु कुबल व इतर भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी जवळ जवळ १५० महीला व पुरुष ज्येष्ठ नागरिकांनी फाॅर्म भरले.


