सावंतवाडी : शेर्ले येथील श्रीमती द्रौपदी विश्राम जाधव (वय ७२) ह्या गुरुवारी दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आपल्या माहेरी नेमळे येथे जाते, असे घरातील व्यक्तींना सांगून घरातून निघाल्या. मात्र, त्या नेमळे येथे पोहोचल्या नसल्याचे चौकशीत समोर आले आहे.
कुटुंबीयांनी नेमळे तसेच इतर नातेवाईकांकडे चौकशी केली असता द्रौपदी जाधव यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. त्यामुळे कुटुंबीयांकडून त्यांचा सर्वत्र शोध घेण्यात येत आहे.
द्रौपदी जाधव या कोणाच्या नजरेस पडल्यास किंवा त्यांच्याबाबत काही माहिती मिळाल्यास कृपया तातडीने ९७६५४३६२८९ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेपत्ता महिलेची माहिती मिळाल्यास ही बातमी जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.



