सावंतवाडीतील ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उत्साहात समारोप.

सावंतवाडी : आचार्य बाळकृष्ण जी यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपरिषद, महाराष्ट्र योगशिक्षक संघ आणि फिटनेस योग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिमखाना हॉल, सावंतवाडी येथे आयोजित ८ दिवसीय निःशुल्क फिटनेस योग शिबिराचा उत्साहात समारोप झाला.

शिबिराच्या आठव्या व सांगता दिनी सकाळी ५:३० वाजता सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठानचे संस्थापक प्रकाश तेंडोलकर, सावंतवाडी नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापति तथा नगरसेवक प्रतीक बांदेकर आणि नगरसेविका सौ. सायली दुभाषी यांच्या हस्ते योगशिक्षक शेखर बांदेकर यांना शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी फिटनेस युवा अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, फिटनेस योग अकॅडमीचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल मेस्त्री, फिटनेस किड्स अकॅडमीचे जिल्हाध्यक्ष विशाल लातये, फिटनेस योग प्रचारक सौ. तृप्ती मालवणकर आणि फिटनेस महिला अकॅडमीच्या जिल्हाध्यक्षा सौ. रसिका सावंत उपस्थित होते.

योगाभ्यासानंतर झालेल्या प्राणायाम सत्रात सर्व योगसाधकांनी आपले अनुभव कथन केले. त्यामुळे सत्र अधिक प्रेरणादायी ठरले. या प्रसंगी मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिबिराला दररोज उपस्थिती वाढत गेली आणि सांगता दिवशी विक्रमी उपस्थिती नोंदवली गेली.

आठ दिवसांच्या कालावधीत सहभागी सर्व साधकांसाठी आरोग्यदायी अलवेरा ज्यूस, गुळवेल ज्यूस, हळदीचे दूध, आवळा, ज्येष्ठमध आणि घरी तयार केलेल्या खाऊचे वाटप करण्यात आले. Online सत्रासाठी तांत्रिक व्यवस्था श्री. नारायण सावंत आणि श्री. काशिनाथ पेडणेकर यांनी पाहिली.

यावेळी बोलताना नगरसेवक प्रतीक बांदेकर म्हणाले, “सावंतवाडीतील नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी फिटनेस योगचे योगवर्ग प्रत्येक वॉर्डमध्ये व्हायला हवेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. विशाल लातये यांनी तर आभार प्रदर्शन सौ. विनया तावडे यांनी केले. “योग करा, निरोगी रहा” या संदेशासह शिबिराची सांगता झाली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles