बातमी कामाची – मुंबईत हक्काचं घर मिळणार, नवी मुंबईत तब्बल ४७७९ घरांची लॉटरी! ; किंमत फक्त २३ लाख, अर्ज कसा करायचा?

नवी मुंबई : सिडको नवी मुंबईतील 4779 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु करणार आहे. सिडकोची 4779 घरे खारघर, कळंबोली आणि तळोजा येथील आहेत. तळोजातील घराची किंमत 23.50 लाख, कळंबोलीतील घराची किंमत 37.70 लाख आणि खारघर येथील घराची किंमत 43.50 लाख रुपये इतकी आहे.

सिडकोची नवीन गृहनिर्माण योजनेत 4779 सदनिकांची नोंदणी 15 ऑगस्ट 2026 पासून ऑनलाइन होत आहे. 15 ऑगस्ट 2026 रोजी स. 11.00 वाजता www.cidcohomes.com या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरू होणार आहे. या योजनेअंतर्गत तळोजा सेक्टर-39 येथे 4229, कळंबोली बस डेपो येथे 257 आणि खारघर बस डेपो येथे 293 सदनिका उपलब्ध आहेत. योजनेतील काही सदनिका दिव्यांगांसाठी राखीव आहेत.

सिडकोच्या 4779 घरांच्या विक्रीसाठी वेबसाईट अपडेट केली आहे. खारघर बस डेपो येथील घरांची किंमत 43.50 लाख रुपये असून या घराचं क्षेत्रफळ 322 चौरस फूट इतके आहे. तर, कळंबोली बस डेपो येथील घराची किंमत 37.70 लाख रुपये आहे. सिडकोच्या या सोडतीत सर्वाधिक घरं तळोजा येथे आहेत. तळोजा येथील घरांची किंमत 23.50 लाख रुपये आहे.

वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 6 लाख रुपयांपर्यंत असलेले आणि भारतात कुठेही पक्के घर नसलेले अर्जदार या योजनेसाठी पात्र आहेत सविस्तर पात्रता निकष आणि अटी पोर्टलवर देण्यात आल्या आहेत. तळोजा, कळंबोली आणि खारघर येथील ही घरे रस्त्यांचे व्यापक जाळे, रेल्वे-मेट्रो सुविधा आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे उत्तम दळणवळणाने जोडलेले आहेत.
सदनिकांचे वाटप हे पात्रता पडताळणी, कागदपत्रांची छाननी आणि योजनेच्या अटी-शर्तीच्या पूर्ततेनुसार असतील. अद्ययावत आणि सविस्तर माहितीसाठी अर्जदारांनी www.cidcohomes.com या संकेतस्थळास भेट द्यावी.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles