मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहूजा हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. सुनीता सतत गोविंदावर विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप करत होती. पण दोन-तीन दिवसांपूर्वी गोविंदा एका अभिनेत्रीसोबत विमानतळावर दिसताच चर्चांना उधाण आले.
गोविंदा त्याचा आगामी सिनेमातील सह-अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकारसोबत दिसला होता. तसेच त्याने तेथील फोटोग्राफर्सशी कोमलची ओळख करुन दिली. ते पाहून गोविंदा कोमलच्या प्रेमात असल्याच्या चर्चांना उधाण आले.

गोविंदा आणि कोमलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. एका यूजरने या व्हिडीओवर कमेंट करत ‘या वयात अफेअर?’ असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका युजरने, ‘म्हातारचाळे सुचले आहेत’ असे म्हणत गोविंदाला सुनावले आहे. तर तिसऱ्या एका यूजरने, ‘हे सर्व स्वस्त मिशो वरुन खरेदी केल्यासारखे वाटत आहे’ अशी टीका केली आहे.

सुनीता आहूजाने देखील गोविंदा आणि कोमलच्या अफेअरच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली. तिने थेट, ‘मुलीच्या वयाच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरत आहे. थोडी तरी लाव वाटली पाहिजे त्याला’ असे म्हटले आहे.

त्यानंतर गोविंदाने फोटोग्राफर्ससमोर सुनीताला चांगलेच सुनावले आहे. सुनिता जी, तुम्ही आता आई बहिणींच्या नावाने शिवीगाळ सुरू करा. ती भाषा वापरली जात आहे. तुम्ही देवाला प्रार्थना केली पाहिजे की, जर लोक तुमच्यापासून प्रेरित होत असतील तर… असे गोविंदा म्हणाला.




