प्राजक्ता माळीने मुंबईत घेतलं तब्बल इतक्या कोटींचं आलिशान घर.

मुंबई : मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मुंबईत कोट्यवधी रुपयांचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. गोरेगाव पूर्व इथल्या ‘ओबेरॉय एक्स्विझिट’ या उच्चभ्रू प्रकल्पात प्राजक्ताने हा फ्लॅट घेतला आहे. या व्यवहारामुळे मनोरंजनविश्वासोबतच रिअल इस्टेट क्षेत्रातही तिच्या नव्या घराची चर्चा रंगली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्राजक्ताने 996 चौरस फुटांचा कार्पेट एरिया असलेला हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट ‘ओबेरॉय एक्स्विझिट’ या टॉवर ‘सी’च्या 28 व्या मजल्यावर आहे. या घरासोबतच जवळपास 240 चौरस फुटांची टँडम कार पार्किंगची सुविधाही मिळाली आहे. हा व्यवहार 12 ऑगस्ट 2026 रोजी अधिकृतपणे नोंदवण्यात आला आहे.

म्हणजेच घराच्या खरेदी किमतीपैकी जवळपास 90 टक्के रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. प्राजक्ताने 6.42 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला आहे. 'ओबेरॉय एक्स्विझिट' हे मुंबईतील प्रीमिअम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातं. या परिसरात यापूर्वीही अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.

या व्यवहारासाठी प्राजक्ताने 32.12 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे घराच्या एकूण किमतीपैकी मोठा हिस्सा तिने गृहकर्जाच्या माध्यमातून उभारला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेण्यात आलं असून या कर्जाला 28 जुलै 2026 रोजी मंजुरी मिळाली होती.

म्हणजेच घराच्या खरेदी किमतीपैकी जवळपास 90 टक्के रक्कम कर्जाच्या माध्यमातून उभारण्यात आली आहे. प्राजक्ताने 6.42 कोटी रुपयांना हा फ्लॅट खरेदी केला आहे. ‘ओबेरॉय एक्स्विझिट’ हे मुंबईतील प्रीमिअम रेसिडेन्शियल प्रोजेक्ट म्हणून ओळखलं जातं. या परिसरात यापूर्वीही अनेक मोठ्या सेलिब्रिटींचे प्रॉपर्टीचे व्यवहार झाले आहेत.

या व्यवहारासाठी प्राजक्ताने 32.12 लाख रुपये स्टँप ड्युटी आणि 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे घराच्या एकूण किमतीपैकी मोठा हिस्सा तिने गृहकर्जाच्या माध्यमातून उभारला आहे. कागदपत्रांवरील माहितीनुसार, प्राजक्ताने इंडियन बँकेकडून 5.78 कोटी रुपयांचं गृहकर्ज घेण्यात आलं असून या कर्जाला 28 जुलै 2026 रोजी मंजुरी मिळाली होती. अमिताभ बच्चन यांनी 2025 मध्ये याच प्रोजेक्टमधील दोन फ्लॅट प्रत्येकी 6 कोटी रुपयांना विकले होते. तर रणवीर सिंहने 2023 मध्ये याच प्रकल्पातीन दोन अपार्टमेंट्स सुमारे 15.25 कोटी रुपयांना विकल्याची नोंद आहे. अभिनयासोबतच उद्योजिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्राजक्ताने मुंबईत केलेली ही कोट्यवधींची गुंतवणूक तिच्या चाहत्यांसाठीही चर्चेचा विषय ठरत आहे.

https://youtu.be/IghNlVqDoY0

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles