सावंतवाडी : शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष, विद्यमान नगरसेवक संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवक देव्या सूर्याजी मित्रमंडळाच्या वतीने मंगळवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत मा. संजू परब यांच्या वतीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी सिलिंग फॅन तसेच वॉल फॅन भेट देण्यात येणार आहेत. रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक सोयी-सुविधा मिळाव्यात, या सामाजिक जाणिवेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
याचवेळी रुग्णालयात गेली अनेक वर्षे निस्वार्थीपणे रुग्णसेवा बजावणाऱ्या सफाईगार व महिला सफाई कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. त्यांच्या अविरत सेवेला सलाम करत शाल व पुष्पगुच्छ देऊन कृतज्ञता व्यक्त केली जाणार आहे.
रक्तदानातून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याबरोबरच रुग्णालयाला आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि रुग्णसेवेत मोलाची भूमिका बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा गौरव करणे, अशा विविधांगी सामाजिक उपक्रमातून संजू परब यांच्या वाढदिवसाला सेवेची आणि माणुसकीची किनार लाभणार आहे.
या कार्यक्रमाला शिवसेना महिला जिल्हाप्रमुख, सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते तसेच मित्रमंडळींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



