पणदूर तिठ्यावर अंबरग्रीस तस्करीचा पर्दाफाश! ; व्हेल माशाच्या उलटीसह ४ जण ताब्यात; तब्बल २ कोटी ४६ लाखांचा मुद्देमाल जप्त.

सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ तालुक्यातील पणदूर तिठा येथे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) विक्रीसाठी घेऊन आलेल्या चार जणांवर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. शनिवारी रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईमुळे अंबरग्रीस तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे.

या कारवाईत तब्बल २ किलो ३७३ ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस, ज्याची अंदाजे किंमत २ कोटी ३७ लाख ३० हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे, जप्त करण्यात आले. अंबरग्रीससह वाहन व इतर साहित्य असा एकूण २ कोटी ४६ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला अंबरग्रीसची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पणदूर तिठा परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित हालचाली आढळून आल्यानंतर पथकाने कारवाई करत चार जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून अंबरग्रीससह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला.

व्हेल माशाच्या उलटीला म्हणजेच अंबरग्रीसला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत असल्याने त्याची अवैध विक्री व तस्करी केली जाते. या प्रकरणामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच जप्त अंबरग्रीस कुठून आणण्यात आले आणि त्याची विक्री कोणाला केली जाणार होती, याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून सुरू आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles