गुरुमाऊली शोभाताईंच्या उपस्थितीत सावंतवाडीत रंगणार श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती सोहळा! ; काकड आरती, भजन, प्रवचनासह आध्यात्मिक पर्वणी, महाप्रसादाचेही आयोजन.

सावंतवाडी : प. पू. श्री. काडसिद्धेश्वर महाराजांच्या शिष्या गुरुमाऊली शोभाताई यांच्या पावन उपस्थितीत सावंतवाडीत श्रावण सप्ताह सांगता व दासबोध समाप्ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. १ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता बाजारपेठ येथील काडसिद्धेश्वर भवन येथे हा आध्यात्मिक सोहळा भक्तिभावात पार पडणार आहे.

या निमित्ताने सकाळपासूनच विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांची पर्वणी भक्तांना अनुभवता येणार आहे. काकड आरती, भजन, प्रवचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजता हेळेकर प्रासादिक भजन मंडळ, कारिवडे-पेडवेवाडी यांचा भक्तिरसपूर्ण भजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे सावंतवाडी परिसरातील भाविकांसाठी हा दिवस आध्यात्मिक आनंदाची अनुभूती देणारा ठरणार आहे.

तसेच बुधवार दि. २ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता भोंसले निवास, वजराट येथे दासबोध समाप्तीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी सावंतवाडी व परिसरातील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles