मुंबई : गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये जोरदार युद्ध सुरु आहे. दोन्ही देश एकमेकांवर हल्ले करताना दिसत आहे. या युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. कच्चे तेल, पेट्रोल आणि डिझेल यांच्या किंमती सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पण आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती आता जवळपास ९९.३६ डॉलर ते १०० डॉलर प्रति बॅरलच्या जवळ पोहोचल्या आहेत. तरीही सरकारी तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
आज कच्च्या तेलाची किंमत –
आज ९ सप्टेंबर २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये तेजीचा कल कायम आहे. अमेरिका आणि इराणमधील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे आणि होर्मुजजवळ तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यांमुळे ऊर्जा पुरवठ्यावर पुन्हा संकटाचे ढग आहेत. म्हणूनच कच्च्या तेलाच्या किमती १०० डॉलर प्रति बॅरलच्या पातळीच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.
आंतरराष्ट्रीय मानदंड मानला जाणारा ब्रेंट क्रूड ऑइल आज ९९.२९ ते ९९.४० डॉलर प्रति बॅरलच्या आसपास व्यापार करत आहे. कालच्या व्यवहार सत्रात तो काही काळ ९९ डॉलरपारही झाला होता. तर अमेरिकन बेंचमार्क वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटची किंमत ९४.२४ डॉलर प्रति बॅरलच्या आसपास कायम आहे.
शहरनिहाय पेट्रोल-डिझेलच्या किमती –
दिल्ली : पेट्रोल १०२.१२ रुपये, डिझेल: ९५.२० रुपये
मुंबई : पेट्रोल १११.३१ रुपये, डिझेल: ९७.९७ रुपये
कोलकाता : पेट्रोल ११३.५१ रुपये, डिझेल: ९९.८२ रुपये
चेन्नई : पेट्रोल १०७.७८ रुपये, डिझेल: ९९.५६ रुपये
गुरुग्राम : पेट्रोल १०२.९७ रुपये, डिझेल: ९५.९४ रुपये
पटना : पेट्रोल ११३.३५ रुपये, डिझेल: ९९.३६ रुपये
रांची : पेट्रोल १०६.१२ रुपये, डिझेल: १००.४९ रुपये
शिमला : पेट्रोल १०२.३१ रुपये, डिझेल: ९४.३४ रुपये



