सावंतवाडी : गणरायाच्या मंगलमय आगमनाने सर्वत्र भक्तीचा आणि उत्साहाचा सुगंध दरवळत असताना सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांनी वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे भक्तिभावाने दर्शन घेतले.
यावेळी गणरायाच्या चरणी नतमस्तक होत तमाम कोकणवासीयांच्या जीवनात सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी आणि भरभराट नांदो, अशी मंगलमय प्रार्थना त्यांनी केली. गणरायाच्या दर्शनाने या भक्तिमय वातावरणाला आणखी प्रसन्नतेची किनार लाभली.
दरम्यान, वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले व युवराज लखमराजे भोंसले यांचे आपुलकीने स्वागत केले. या सदिच्छा भेटीमुळे गावातील गणेशोत्सवाच्या उत्साहातही विशेष रंग भरला.
गणरायाच्या चरणी भक्ती, मनात कोकणवासीयांच्या सुख-समृद्धीची भावना अन् आपुलकीच्या भेटीतून जपलेला स्नेहबंध, अशी ही भेट वेत्ये ग्रामस्थांसाठीही आनंददायी ठरली.



