वामनराव महाडिक विद्यालयात वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा! ; वन्यजीव संवर्धनातून निसर्गाचा समतोल राखण्याचे आवाहन.

तळेरे :  वामनराव महाडिक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, तळेरे येथे वन्यजीव सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी वन्यजीव अभ्यासक डॉ.प्रवीण सावंत, फोंडा वनपाल सारिक फकीर, फोंडा वनपाल अमोल पटेकर, हरकुळ वनरक्षक स्वाती व्हनवडे, कासार्डे वनरक्षक शुभम पाटील, फोंडा वनरक्षक अंकुश माने,फोंडा वनरक्षक रोहित सोनगेकर, प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर, प्राध्यापक सचिन शेटये, शाळा समिती सदस्य, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

वन्यजीव अभ्यासक डॉ.प्रवीण सावंत यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विविध पक्षी आणि प्राण्यांची वैशिष्ट्ये,त्यांचे नैसर्गिक अधिवास, पर्यावरणातील त्यांचे महत्त्व आणि त्यांच्या संरक्षणाची आवश्यकता याविषयी सविस्तर माहिती दिली.निसर्गातील प्रत्येक जीव हा पर्यावरणाचा अविभाज्य घटक असून,जैवविविधतेचे संरक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे,असे त्यांनी आपल्या मनोगतातून स्पष्ट केले. वन्यजीवांविषयी प्रेम आणि संवेदनशीलता जोपासून निसर्गसंवर्धनासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे,असे आवाहनही त्यांनी केले.

प्रशालेचे प्राचार्य अविनाश मांजरेकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून वन्यजीवन आणि निसर्ग यांचे महत्त्व विशद केले. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षसंवर्धन आणि वन्यजीवांचे संरक्षण आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वन्यजीव विभाग आणि प्रशालेच्या वतीने संयुक्तपणे वृक्षारोपण करण्यात आले.या उपक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यात आला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सचिन शेटये यांनी केले,तर इयत्ता बारावीची विद्यार्थिनी मयुरी तळेकर हिने आभार मानले. वन्यजीव

सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles