वेंगुर्ला शहरात दुर्गामाता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद!

वेंगुर्ला : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची गाथा जागवणारी आणि हिंदू समाजात राष्ट्रभक्ती व धर्मजागृतीची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता दौड श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वेंगुर्ला विभाग व गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वात वेंगुर्लेत सुरु आहे. घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत होत असलेल्या या दौडीची आज नववी माळ सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शिवतीर्थ (छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक, माणिकचौक) येथे संपन्न झाली .
शिवतीर्थ येथे प्रतिमापूजन, शस्त्रपूजन आणि प्रेरणामंत्र पठण करून ही दौड शिवतीर्थ(माणिकचौक) – कॅम्प काॅर्नर दुर्गामाता व परत शिवतीर्थ अशी संपन्न झाली.यामध्ये प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, सुरेंद्र चव्हाण, प्रज्वल कोंयंडे, संदिप कोयंडे, शरद मेस्त्री, सत्यवान परब, अमोल आरोसकर, मंजुषा आरोलकर, रसिका मठकर, कृपा गिरप मोंडकर , अमित राऊत, आशिष पाडगांवकर, संजय तेरेखोल कर , गिरीश गोगटे , रवींद्र शिरसाठ , महादेव मेस्त्री आदिसह हिंदु धर्माभिमानी सहभागी झाले होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles