इन्सुली रमाईनगर येथे ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा.

सावंतवाडी:  भीमगर्जना युवक मंडळ इन्सुली, रमाईनगर यांच्या विद्यमाने  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर इन्सुली रमाईनगर येथे 70 वा. धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष आयु. अरविंद जाधव, उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव, सल्लागार सदानंद जाधव, दिपक जाधव, ह्युमन राईट कोकण विभागीय उपाध्यक्ष आनंद जाधव व धम्मचारी लोकदर्शी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अर्धाकृती पुतळ्यास तसेच भगवान बुद्धाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व मेणबत्ती प्रज्वलित करून सामुदायिक बुद्धवंदनेने झाली. धम्मचारी लोकदर्शी यांनी आजच्या दिवसाचे महत्व विषद करून आपल्या समाजातील लोकांची धर्मांतरामुळे झालेल्या परिवर्तनाचे कथन केले. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म का स्वीकारला व बौद्ध धर्माच्या उन्नतीसाठी आपण काय केले पाहिजे, याची जाणीव करून दिली.


यावेळी आनंद जाधव यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देत बाबासाहेबांच्या कार्याचा उल्लेख केला. तसेच सानिका, स्मृतिषा व सुप्रिया यांनी आजच्या दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. शेवटी धम्मापालन गाथेने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन लोकदर्शी यांनी तर आभार अरविंद जाधव यांनी मानले. अखेर शिवस्मारक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने कार्यक्रम संपला.


या कार्यक्रमात राघोबा जाधव, कृष्णा जाधव, अशोक जाधव, राहुल जाधव, योगेश जाधव, नितेश जाधव, मिथिल जाधव, तन्मय जाधव, अमृत जाधव, दिपेश जाधव, तेजस जाधव,संजना जाधव, सविता जाधव, दिपाली जाधव, स्मिता जाधव, अनुजा जाधव, अनघा जाधव, भावना जाधव, सोनाली जाधव, नलिनी जाधव, शरयू जाधव, काजल जाधव, मयुरी जाधव,सृष्टी जाधव, प्रद्युम जाधव, यज्ञश जाधव इत्यादी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles