वैभववाडी महाविद्यालयाच्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्ग नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद.

वैभववाडी : येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात शासनमान्य मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुराभिलेख संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई आणि आनंदीबाई रावराणे महाविद्यालयातील इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर २०२६ या कालावधीत मोडीलिपी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली, पुणे, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर येथील ४५ प्रतिनिधींनी नोंदणी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
या मोडीलिपी प्रशिक्षण कालावधीत दररोज दोन तास तज्ञ मार्गदर्शक प्रशिक्षण देणार आहेत. विद्यार्थी वर्गासाठी प्रवेश फी रू. ५०/- व प्रशिक्षण फी रू. २५० मिळून रू.३००/- तर इतरांसाठी प्रवेश फी रू.१०० व प्रशिक्षण फी रू.५०० मिळून रू.६००/- इतकी फी आहे. प्रशिक्षण वर्गातील ८०% उपस्थिती असणाऱ्या प्रशिक्षणार्थींची १०० गुणांची परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये ५०% म्हणजे ५० गुण मिळविणा-या प्रशिक्षणार्थींना उत्तीर्ण घोषित करून प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र म्हणून शाळा/ महाविद्यालय ओळखपत्र व आधार कार्ड झेरॉक्स तसेच इतरांसाठी आधार कार्ड व प्रत्येकी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो आवश्यक आहेत.
या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गात विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक, इतिहासप्रेमी, अभ्यासक, शासकीय, निमशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच मोडीलिपी शिकण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्ती सहभागी होऊ शकतात.
जागा मर्यादित शिल्लक असल्याने आपला प्रवेश दोन दिवसांत निश्चित करून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन वैभववाडी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.आर. चव्हाण यांनी केले आहे.

या प्रशिक्षण वर्गाच्या अधिक माहितीसाठी इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.एन पाटील (9834984411) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles