सावंतवाडी पंचायत समिती येथे संविधान दिन उत्साहात साजरा.

सावंतवाडी : पंचायत समिती सावंतवाडी येथे आज दिनांक २६ नोव्हेंबर २०२६ रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृहात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.यावेळी पंचायत समितीच्या सभापती श्रीमती सुस्मिता जाधव, सन्माननीय सदस्य जितेंद्र गावकर, श्रीम. प्रणाली टिळवे, शरद धाऊसकर, मायकल डिसोजा गटविकास अधिकारी निलेश जाधव, मंदार जुवेकर उपअभियंता लघुपाटबंधारे संतोष गोसावी गट शिक्षणाधिकारी तसेच तालुकास्तरीय विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी व सावंतवाडी तालुक्यातील आत्माराम सहदेव साळगांवकर माजगांव, शुभांगी नागेश ताटे चराठे, स्नेहा संतोष म्हालटकर कारीवडे, श्रीम. सुचिता गोविंद माळकर कारीवडे श्रीम. रत्नमाला जिवबा वीर बांदा, श्रीम. सुनितास सुनिता सिताराम मुळये बांदा, उमेश तुकाराम राऊळ कोलगांव, गणपत नाना आंगचेकर, आंबेगांव दाजी न्हानू तेली आंबेगांव श्रीम.दुर्वा देवदत्त पालव कारीवडे, अक्षय सोमा जाधव माजगांव, सुरेश केशव सातार्डेकर आरोंदा निलेश शशिकांत तारी आदी ग्रामस्थ लाभार्थी उपस्थित होते.

दरम्यान, सावंतवाडी पंचायत समिती सावंतवाडीचे गटविकास अधिकारी निलेश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना भारतीय संविधानाचे महत्व उपस्थितांना सांगतिले. त्यानंतर जितेंद्र गावकर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भारतीय संविधान हे प्रत्येक घरा घरात लावणे आवश्यक असून त्याचा योग्य तो मान राखत संविधानाप्रमाणे देशाचे राजकारण व प्रशासकिय कामकाज केले जात असल्याचे सांगितले‌. पंचायत समिती सावंतवाडीच्या सभापती श्रीमती सुस्मिता जाधव यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार व कर्तव्ये तसेच लोकशाही मूल्यांचे जतन करण्याबाबत तसेच या संविधानामुळेच मागासवर्गीय समाजातील एक महिलेला तालुक्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याचे सांगत याप्रती आभारपुर्वक आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंचायत समिती सावंतवाडीमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या ग्रामीण भागातील लाभार्थ्यांपर्यंत संविधानातील मूल्ये व विचार पोहोचविण्याच्या उद्देशाने ‘घरघर संविधान’ या उपक्रमांतर्गत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतिमेचे वितरण करण्यात आले. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले न्याय, स्वातंत्र्य, समता व बंधुता या मूल्यांचे महत्त्व समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावे आणि संविधानाबाबत जनजागृती निर्माण व्हावी, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत कृषि अधिकारी शुभदा सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाल्याचे सांगतिले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles