मुंबई : आयपीएल 2027 च्या आधी, पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सने एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्याची लाखो क्रिकेट चाहते गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत होते. मुंबई इंडियन्सने आयपीएल 2027 हंगामासाठी रोहित शर्माला आपला नवीन कर्णधार म्हणून घोषित केले आहे. 2013 ते 2024 या 11 वर्षांच्या कालावधीत संघाचे नेतृत्व केल्यानंतर या अनुभवी खेळाडूला पदावरून हटवण्यात आले. हार्दिक पांड्याला संघाचा नवा कर्णधार म्हणून घोषित करण्यात आले. सूर्यकुमार यादवला त्याचा उपकर्णधार म्हणून घोषित करण्यात आले होते. पाच वेळच्या विजेत्या संघासाठी हा निर्णय फारसा यशस्वी ठरला नाही, कारण गेल्या तीन वर्षांत ते केवळ एकदाच प्लेऑफसाठी पात्र ठरले.
मुंबई व्यवस्थापन मैदानातील कामगिरी आणि काही मैदानाबाहेरील वादांमुळे फारसे समाधानी नव्हते. याचा परिणाम म्हणून संघाने पांड्यासोबत संबंध तोडले आणि अर्शदीप सिंगच्या बदल्यात त्याला पंजाब किंग्सकडे पाठवले. या निर्णयामुळे मुंबई पुन्हा एकदा नवीन कर्णधाराच्या शोधात होती आणि नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्याऐवजी, त्यांनी पाच चॅम्पियनशिप जिंकण्यास मदत करणाऱ्या रोहितकडेच पुन्हा मोर्चा वळवला आहे
नवीन मुख्य प्रशिक्षक कायरोन पोलार्ड यांच्या नेतृत्वाखाली संघ व्यवस्थापनाने हार्दिक पांड्याला पंजाब किंग्सकडे पाठवून एक मोठा बदल केला. विखुरलेल्या संघाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा अनुभवी रोहित शर्मावर विश्वास ठेवला आहे. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सचा ‘हिटमॅन’ असे उगाच म्हटले जात नाही. 2013 मध्ये मोसमाच्या मध्यात कर्णधारपद स्वीकारल्यानंतर त्याने मुंबईला आयपीएलमधील सर्वात शक्तिशाली संघात रूपांतरित केले. त्याच्या नेतृत्वाची आकडेवारी अतुलनीय आहे.
रोहितच्या कर्णधारपदाखाली, रोहित शर्माने मुंबई इंडियन्सला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये सलग पाच विजेतेपदे मिळवून दिली. तो एम.एस. धोनीसोबत आयपीएलच्या इतिहासातील संयुक्तपणे सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहितने आतापर्यंत एकूण 158 आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. यापैकी त्याने 87 सामने जिंकले असून 67 गमावले आहेत. कर्णधार म्हणून रोहित शर्माची विजयाची टक्केवारी 55.06% आहे, ज्यामुळे तो लीगच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे.



