राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा वारसा शाळेच्या भिंतींवर! ; गौतम चेंदवणकर कुटुंबीयांकडून चेंदवण नं. १ शाळेला दहा राष्ट्रपुरुषांचे फोटो भेट.

कुडाळ : विद्यार्थ्यांच्या मनात राष्ट्रप्रेम, सामाजिक जाणीव आणि थोर राष्ट्रपुरुषांच्या विचारांचा संस्कार रुजावा, या उदात्त हेतूने ग्रामपंचायत सदस्य माननीय श्री. गौतम दत्ताराम चेंदवणकर व त्यांच्या कुटुंबीयांकडून जिल्हा परिषद शाळा चेंदवण नं. १ या शाळेला दहा राष्ट्रपुरुषांचे फोटो भेट देण्यात आले. या उपक्रमातून शाळेच्या शैक्षणिक वातावरणाला प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले असून, विद्यार्थ्यांना थोर महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देण्याचा एक स्तुत्य प्रयत्न करण्यात आला.

या प्रसंगी गावचे सरपंच माननीय श्री. वैभव चेंदवणकर, उपसरपंच तेंडुलकर मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. स्वप्नील चेंदवणकर, ग्रामपंचायत सदस्य श्री. नारायण शृंगारे, सौ. शिल्पा चेंदवणकर, माजी सरपंच धुरी मॅडम, श्री. बाळू कोचरेकर, श्री. बाळा धुरी, श्री. अण्णा भरडकर तसेच तलाठी श्री. नेरकर उपस्थित होते.

या शैक्षणिक उपक्रमासाठी श्री. गौतम चेंदवणकर, सौ. शिल्पा चेंदवणकर, श्री. सुनील चेंदवणकर, श्री. प्रभाकर चेंदवणकर आणि श्री. अमित चेंदवणकर यांनी योगदान दिले.

राष्ट्रपुरुषांचे फोटो हे केवळ शाळेच्या भिंतींची शोभा वाढवणारे चित्र नसून, त्यांच्या महान कार्याची आणि विचारांची विद्यार्थ्यांना सातत्याने आठवण करून देणारे प्रेरणास्रोत आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, कृतज्ञता आणि आदर्श जीवनमूल्यांची जाणीव अधिक दृढ होण्यास मदत होते.

या सामाजिक व शैक्षणिक योगदानाबद्दल शाळेच्या वतीने सर्व देणगीदारांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. समाजातील दानशूर व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रासाठी पुढाकार घेतल्यास ज्ञानाची ही ज्योत अधिक तेजस्वीपणे प्रज्वलित होत राहील, असा आशावाद यावेळी व्यक्त करण्यात आला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles