भाजप खासदाराच्या कारचा भीषण अपघात.

रायपूर : छत्तीसगडचे भाजप खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. खरोराच्या बंगोलीजवळ हा भीषण अपघात झाला. खासदार लक्ष्मी वर्मा या खरोराच्या रायपूरमधून परतत होत्या. त्यावेळी समोरून येणाऱ्या कारने धडक दिली. अपघातात खासदार लक्ष्मी वर्मा यांचा जखमी झाल्या. त्याचबरोबर या अपघातात कार चालक देखील जखमी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोराच्या बंगोलीजवळ कारचा अपघात झाल्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोक मदतीला धावले. अपघातानंतर दोघांना जवळील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासदार लक्ष्मी वर्मा यांना पुढील उपचारासाठी रायपूर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना रायपूरमधील AIIMS मधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खरोराच्या बंगोली पोलीस स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. खासदार लक्ष्मी वर्मा हे खरोराहून रायपूरच्या दिशेने जाताना अपघात झाला. याचदरम्यान त्यांची कार समोरून येणाऱ्या कारला धडकली. अपघातात दोन्ही वाहनांचं नुकसान झालं.

लक्ष्मी वर्मा यांना अपघातांनंतर जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारासाठी रायपूरला दाखल करण्यात आलं. त्यांना रायपूरच्या AIIMS रुग्णालयात दाखल केलं. त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत. अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांना देखील या घटनेची माहिती दिली आहे. खरोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपूर्ण प्रकार घडला आहे. अपघात नेमका कसा झाला, याची माहिती पोलीस घेत आहेत. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अपघातस्थळाजवळील सीसीटीव्ही तपासण्याचे काम पोलिसांनी हाती घेतलं आहे. अपघाताआधी वाहतूक कोंडी होती का, याचाही शोध घेतला जात आहे. खासदार लक्ष्मी वर्मा यांना रायपूरमधील AIIMS रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचे नातेवाईक तातडीने भेटीला पोहोचले आहेत. खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या अपघाताची माहिती त्यांच्या कार्यकर्ते, समर्थकांना समजली. त्यानंतर त्यांनी तातडीने रायपूरमधील रुग्णालयात धाव घेतली. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत अद्याप सविस्तर माहिती हाती आलेली नाही.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles