सावंतवाडी : येथील महिलेने नारी शक्तीचे एक वेगळे उदाहरण सादर केले आहे.
दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी उप जिल्हा रुग्णालयात एका रुग्णाला A निगेटिव्ह या अत्यंत दुर्मिळ रक्तगटाची अति तातडीने गरज होती. ही बाब सावंतवाडी येथील एचडीएफसी बैंक कर्मचारी सौ. नबीला हेरेकर यांना समजताच त्यांनी स्वतःहून रुग्णाच्या नातेवाइकांना संपर्क साधले व आपण रक्तदान करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले व रात्री ९.३० वाजता ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात जाऊन रक्तदान केले. असे करत सौ. नबीला हेरेकर यांनी नारी शक्तीचे एक उदाहरण समाजासमोर मांडत रक्तदान हे श्रेष्ठदान हा संदेश दिला.
नबीला हेरेकर ह्या रणरागिणीने रक्तदान करून ठेवले आदर्श उदाहरण.
[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]


