स्व. पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना उद्या सावंतवाडीत कृतज्ञता सभेतून अभिवादन.!

सावंतवाडी :  स्व. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना कृतज्ञता सभेतून उद्या शुक्रवारी अभिवादन करण्यात येणार आहे‌. शेतकऱ्यांना कर्जमाफी, अन्नसुरक्षा कायदा, मनरेगा योजना, भूमी अधिग्रहण कायदा, माहिती अधिकार कायदा, शिक्षण हक्क कायदा, वनाधिकार कायदा, तसेच भारत अमेरिका आण्विक करार या अशा अनेक जनसामान्यांचं आणि गरिबांचं आयुष्य बदलणाऱ्या महत्वाच्या सुधारणा डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीतच झाल्या असून देशातील एक सभ्य, शांत, संयमी आणि सुसंस्कृत लोकनेत्याच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी उद्या शुक्रवार दि. १० जानेवारी २०२५ रोजी सायं ६.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे ही कृतज्ञता सभा आयोजित केली आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आम्ही सावंतवाडीकर व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी यांनी केलले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles