Friday, June 20, 2025

Buy now

spot_img

स्वारगेट बलात्कार प्रकरणानंतर ‘हा’ मोठा निर्णय.

पुणे : पुण्यातील स्वारगेट परिसरातील शिवशाही या एसटी बसमध्ये एका 26 वर्षांच्या तरूणीवर बलात्कार करण्यात आला. याप्रकणातील आरकोपी दत्तात्रय गाडे याला 70 तासांच्या शोधमोहिमेनंतर अखेर काल अटक करण्यात आली. त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र स्वारगेट बस स्टँडसारख्या वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या घटनेने प्रचंड खळबळ माजली असून राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. राज्यात आणि पुण्यातही कायदा सुव्यवस्थेचे वातावरण आहे की नाही, गुन्हेगारांना वचक कधी बसणार? असे प्रश्न विरोधकांकडून तसेच जनेतकडूनही विचारला जात आहेत. स्वारगेट अत्याचार प्रकरणातनंतर आता एक मोठा निर्णय घेण्यात येणार आहे.

स्वारगेट बसस्थानकावर सुरक्षारक्षक वाढणार –

स्वारगेट बसस्थानकावरील बलात्काराच्या घटनेनंतर येथील सुरक्षेचा मुद्दा एरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर स्वारगेट एसटी प्रशासनाकडून 36 सुरक्षारक्षकांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सहा महिला सुरक्षारक्षक देखील असणार आहेत, असे एसटी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. सुरक्षित प्रवासासाठी एसटीला प्राधान्य देण्यात येते. विशेषतः सवलतीमुळे सध्या महिला प्रवाशांची संख्या वाढली आहे. परंतु मंगळवारी घडलेल्या घटनेनंतर एसटी बसस्थानकात सुरक्षेची कमतरता असल्याचे दिसून आले. याला एसटी प्रशासनाला जबाबदार धरण्यात आले आहे. त्यामुळे बसस्थानक आणि महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर शिवाजीनगर एसटी स्थानकातील काही सुरक्षारक्षक स्वारगेट स्थानकात तैनात करण्यात आले आहे. स्वारगेट बसस्थानकातील सुरक्षा वाढविण्यासंबंधी वरिष्ठांकडे पाठविण्यात प्रस्ताव आला असल्याचे विभाग नियंत्रक प्रमोद नेहुल यांनी सांगितलं.

स्वारगेट आगारात झालेल्या बलात्काराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बलात्कार, विनयभंग अशा प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या शहरातील सराईतांची झाडाझडती घेण्याचे आदेश दिले आहेत. महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या, तसेच बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईतांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांची चौकशी करावी, असे आदेश सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांना देण्यात आल्याची माहिती आयुक्त आमितेश कुमार यांनी दिली

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles