कुडाळ : तालुक्यातील निळेली शाळा नंबर १ या शाळेचे नवीन वर्ग खोलीचे बांधकाम सुरू असून पूर्णपणे बांधकाम निकृष्ट दर्जाचे आहे, असे दिसते. हे मुलांच्या सोयीचे दिसून येत नाही व अंदाजपत्रक सूचवल्याप्रमाणे काम दिसत नाही. सदरचे काम अनधिकृत कोणाच्या नावे आहे?, हे दर्शविणारे नाम फलक नाही. हे काम पूर्णपणे निष्कृष्ट दर्जाचे असून या कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे ग्रामपंचायत सदस्य सीताराम जानकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, हे काम चांगले व्हावे या उद्देशाने आपण दिनांक ०१/ ०३/२०२५ रोजी पाहण्यासाठी गेलो असता तेथे उपस्थित असलेले सूर्यकांत चिंतामणी धुमक व देवजी घनश्याम धुमक हे माझ्या अंगावर मला मारण्यासाठी धावून आले. तसेच त्यांनी “तुला येथे येण्याचा संबंध काय?, आम्हाला पाहिजे ते आम्ही काम करणार आहोत. काम आम्ही घेतले आहे, तू येथे यायचे नाही.!” असा मला दम दिला हा सर्व प्रकार शाळेचे शिक्षक श्री. गावडे व शिक्षिका तसेच विद्यार्थी यांच्या समोर झालेला आहे.
मा. उपअभियंता कुडाळ यांच्या कार्यालयाकडे व अभियंता श्री.सावंत यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांच्याकडे काहीही माहिती नाही., असे निदर्शनास आले. सदरचे काम सद्गुरु मजूर सहकारी संस्था नेमळे ता. सावंतवाडी यांच्या नावावर असून मजुरांना काम मजुरांना रोजगार मिळावा, या उद्देशाने संस्थेला काम दिलेले आहे. परंतु संस्थेकडे मजूर नसताना खोटे मजूर दाखवून संस्थेने अटी शर्तीचा भंग करून काम मिळवलेले आहे. सदर संस्थेकडे मजूर नाहीत. काम मिळून काही संस्थाचालक कमिशनवर दुसऱ्यालाच काम दिलेले आहे. त्यामुळे सदर संस्थेकडील मजुरांची सक्षम पडताळणी होणे आवश्यक आहे. सदर काम निष्कृष्ट होऊन भविष्यात विद्यार्थ्यांच्या जीवावर घाव घालणारे ठरू शकते व शासनाचा लाखो रुपयाचा निधी वाया जाणार आहे. हे काम तात्काळ थांबून सदर संस्थेचा ठेका रद्द करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी. सन 2020- 2022 मध्ये या ठिकाणी एक वर्गखोली बांधलेली असून सदर वर्ग खोलीचे बांधकाम श्री सूर्यकांत धुमक यांनी केलेले आहे. हे काम निष्कृष्ट दर्जाचे झालेले आहे. याची याची देखील समक्ष चौकशी व्हावी व जबाबदारी निश्चित करून सदर काम रक्कम वसूल करण्यात यावी. श्री. धुमक हे दुसऱ्यांच्या नावावर काम मिळून व काही संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून कामे करत असतात व दादागिरी करतात.
शाळेच्या आवारात श्री. धुमक यांनी आर.सी.सी इमारत बांधलेली असून ती सध्या विनाकारण मोडकळीस आलेली असून सदर इमारतीची कुठेही नोंदणी नाही. इमारती पासून मोठा अनर्थ घडू शकतो, याची चौकशी होणे आवश्यक आहे. श्री. धुमक व संबंधित संस्था संगनमताने फक्त पैसा मिळवणे, असाच उद्देश आहे. तरी वरील सर्व कामाची व संस्थेची चौकशी करून कारवाई करण्यात यावी. सदर संस्थेस बील अदा करू नये. अन्यथा उपोषणाचा मार्ग अवलंबला लागेल, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य सीताराम जानकर यांनी निवेदनाद्वारे दिलाय.