Wednesday, July 9, 2025

Buy now

spot_img

कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धा २५ ऑगस्ट रोजी सावंतवाडीत. ; कवींना सहभागी होण्याचे आवाहन.

सावंतवाडी : दरवर्षाप्रमाणे यंदाही कै. विद्याधर भागवत स्मृती स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक २५ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. चिंतामणी साहित्य सहयोग सहकारी प्रकाशन संस्था व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या दोन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सदर स्पर्धा रविवार दिनांक २५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी येथे घेण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे नियम लक्षात घेता कविता स्वरचित असावी, दीर्घ कविता नसावी, कवितेचे सादरीकरण स्वतः करावे, असे आहेत. प्रथम पारितोषिक रुपये ५००/, द्वितीय पारितोषिक रुपये ३००/, तृतीय पारितोषिक रुपये २००/, उत्तेजनार्थ दोन पारितोषिक रुपये १००/ आणि प्रमाणपत्र असे असून सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान केले जातील. ही स्पर्धा गोवा, सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित असून आपली नाव नोंदणी उषा परब (मोबाईल क्रमांक  ९४२३८१८८२८) यांच्याकडे दिनांक २३ ऑगस्टपर्यंत करावी, असे आयोजकांनी कळविले आहे.

सहभागी स्पर्धकांच्या कविता ‘आरती मासिक’ या अंकातून प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. तरी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावी, असे आवाहन अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. जी. ए. बुवा, प्रभाकर भागवत, उषा परब, विठ्ठल कदम व भरत गावडे यांनी केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles