आदर्श विचारांचा प्रसार करून विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत होलीकोत्सव.!

कणकवली : येथील विद्यामंदिर माध्यमिक प्रशालेत पर्यावरण विभागामार्फत आदर्श विचारांचा प्रचार करून होळी उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरण प्रमुख प्रसाद राणे सरांनी कुविचारांची प्रतिमा तयार करून समाजात वाईट विचार कसे नाशवंत आहेत. यांची होळी करून पुरुण कथेचा दृष्टांत देत होळी सणांचे महत्व विद्यार्थांना पटवून दिले.

आजच्या प्रगत जगात पर्यावरण वाचविण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्षतोड यांची होळी सणां निमित्त माहिती सांगून मार्गदर्शन केले यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री पी जे कांबळे सरांनी होळी सण म्हणजे समतेचे विश्व बंधुत्वाचे प्रतिक असणारा सण अशा शब्दांत होळीचे वर्णन करून समाजाती रूढी पंरपरा अंधश्रद्धा स्रीयांवरील अन्याय अत्याचार होळी निमित्त गाढून टाकले पाहिजे. आदर्श संस्कार मूल्य जपून राष्ट्र विकास साधला पाहिजे, असे मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. पर्यवेक्षक श्री अच्युतराव वणवे सरांनी होळीचे महत्व विषध करून कुविचार जाळून टाकावेत आणि आदर्श विचारांची कास धरावी अशा शब्दांत होळीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. विद्यामंदिर प्रशालेची आदर्श विचारांची होळीची रॅली मुख्य बाजार पेटेतून कणकवली शहरातून काढण्यात आली घोषणांच्या गर्जेत रॅली वाजगाजत संपूर्ण शहरातून काढून प्रशाळेच्या प्रारंगणांत होळीची आहूती जाळण्यात आली यावेळी प्रशाळेतील शिक्षक श्री शेळके जेजे सर श्री नागभिडकर सर सौ केळुसकर मॅडम सौ शिरसाट मॅडम व विद्यार्थी उपस्थित होते.

ADVT –

 

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles