सावंतवाडी : नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी नियुक्ती झालेल्या अश्विनी पाटील यांनी आपला पदभार स्वीकारला आहे. तत्कालीन मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची पालकमंत्र्यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणी प्रभारी अधिकारी म्हणून वेंगुल्याचे मुख्याधिकारी पारितोषिक कंकाळ यांना नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, अश्विनी पाटील यांची मुख्याधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कार्यभार स्वीकारला आहे.
त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून आज स्वागत करण्यात आले. यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर, उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ, सावंतवाडी शहर अध्यक्ष ॲड. राजू कासकर, सतीश आकेरकर, केतन सावंत, सिद्धेश आकेरकर, साहील तळकटकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.