अजयकुमार सर्वगौड यांना सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी, कर्मचारी व तथागत नागरी सहकारी पतपेढीकडून सेवानिवृत्तीनिमित्त शुभेच्छा.!

सावंतवाडी : सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवलीचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगौड यांची सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी कर्मचारी व तथागत नागरी सहकारी पतपेढी सिंधुदुर्ग संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी सदिच्छा भेट घेऊन त्यांना सेवानिवृत्तीच्या सदिच्छा दिल्या. यावेळी तथागत नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू, ज्येष्ठ संचालक रमेश कदम, मोहन जाधव आदी उपस्थित होते.

श्री. सर्वगौड यांनी पतसंस्थेला इन्व्हर्टर देणगी दाखल दिला आहे. या भेटीत पतसंस्थेच्या वतीने त्यांना धन्यवाद देण्यात आले व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. श्री. सर्वगौड यांनी पतसंस्थेकडून समाजातील सुशिक्षित तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून त्यांना स्वयंरोजगार प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केले. संस्थेच्या माध्यमातून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

ADVT –

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles