न्हावेली उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या प्रयत्नांना यश.! ; आ. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून तातडीनं ‘त्या’ मागणीची दखल.

सावंतवाडी : न्हावेली येथील मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यावर पडलेले खड्डे व पावसाळ्यात रस्त्यावर साचणारे पाणी लक्षात घेता शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख तथा न्हावेलीचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर संबंधित ठेकेदाराने रस्ता पुन्हा एकदा सुस्थितीत करून दिला. श्री. पार्सेकर यांनी यासाठी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांचे लक्ष वेधलं होते. त्यानंतर कामाला तातडीने गती मिळाली.

शिरोडा सावंतवाडी महामार्गाला लागून न्हावेली माऊली मंदिरकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जुन 2021 रोजी नव्याने करण्यात आला होता. पाच वर्ष या रस्त्याचे दायित्व असताना हा रस्ता वर्षभरानंतर खड्डेमय बनला होता. या रस्त्याची डागडूजी तसेच गटार अन्य गोष्टींकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केल्याने तसेच संबंधित विभागाकडून ठेकेदाराला पाठीशी घालण्यात येत असल्याने उपसरपंच श्री पार्सेकर यांनी 26 जानेवारीला उपोषण छेडण्याचा इशारा संबंधित विभागाला दिला होता. एकूणच त्यांच्या इशारा नंतर खडबडून जागे झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक विभागाकडून ठेकेदेराकरवी स्त्यावरील पावसाळ्यापुर्वी रस्त्याची पुनश्च डागडूजी करण्याचे आश्वासना दिले होते. या आश्वासनाअंती श्री पार्सेकर यांनी अखेर 26 जानेवारी रोजी उपोषणाचा घेतलेला निर्णय मागे घेतला होता. त्यानंतर सातत्याने श्री पार्सेकर यांनी संबंधित विभाग आणि ठेकेदाराकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचेही लक्ष त्यांनी वेधलं होत. तदनंतर लागलीच रस्त्यावरील खड्डे संबंधित ठेकेदाराने बुजवून तसेच या ठिकाणी खराब झालेला त्या ठिकाणीचा रस्ता नव्याने बनवून दिला आहे. उपसरपंच श्री पार्सेकर यांनी यासाठी केलेले प्रयत्न आणि मार्गी लागलेले काम पाहून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले व शिवसेना उपतालुका प्रमुख सावंतवाडी तथा उपसरपंच पार्सेकर यांनी मंत्री केसरकर यांचे आभार मानले

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles