सावंतवाडी : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे येथील बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समितीच्या वतीने गुरुवारी 10 एप्रिल रोजी समाज मंदिरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिराचे उद्घाटन तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या हस्ते व पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी नऊ वाजता होणार आहे. तरी या रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन समन्वय समितीने केले आहे.
ADVT –