मुंबई : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीचे औचित्य साधत ‘कोकण कट्टा’ या संस्थेच्या पदाधिकार्यांनी साई आधार संस्थेला भेट व मुलांसमवेत गोड जेवणाचा आनंद घेतला. कोकण कट्टाचे संस्थापक अजित पितळे यांच्या मार्गदर्शनाने उद्योजक जयेश बंदरकर यांच्या आयोजनाने महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने मुलांना गोड जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच रात्री तिखट जेवणाची व्यवस्था केली होती.
साई आधारचे विशाल परुळेकर यांनी बाबासाहेबाच्या अफाट कार्याविषयी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. कोकण कट्टा मित्र परिवार संतोष पाटकर, राजू चव्हाण, निशिकांत मोरे यांची यावेळी उपस्थिती होती.