Monday, June 16, 2025

Buy now

spot_img

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर.! ; १८ रोजी पुणे येथे वितरण.

मुंबई :  सन 2023-24 देण्यात येणाऱ्या शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. याबाबतची घोषणा क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात केली. एकूण 89 पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून 18 खेळाडूंना थेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. माजी राष्ट्रीय कबड्डीपटू, संघटक शंकुतला खटावकर यांना जीवनगौरव तर पॅरा ऑलिम्पिक पदक विजेता सचिन खिलारी, जागितिक आर्चर आदिती स्वामी, क्रिकेटपटू शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल यांचा शिवछत्रपती राज्य क्रीडा थेट पुरस्काराने गौरव केला जाणार आहे.

शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक-जिजामाता पुरस्कार, खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार, दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार असे एकूण 89 पुरस्काराची घोषणा करण्यात आली. जीवन गौरवसाठी 5 लाख, शिवछत्रपती पुरस्कारासाठी 3 लाख रूपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कार वितरण सोहळा येत्या 18 एप्रिल 2025 रोजी पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजीत पवार, केंद्रिय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे, विधान सभेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्ह, राज्यमंत्री माधुरी मिसाळ आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहे. अप्पर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर व क्रीडा आयुक्त हिरालाल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

2001 पासून पुरस्काराची परंपरा –
पुरस्कराच्या घोषणेनंतर मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की, राज्यात क्रीडा संस्कृतीचा वारसा जपला जाऊन त्याचे संवर्धन व्हावे, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या क्रीडा महर्षी, मार्गदर्शक, खेळाडूंच्या कार्याचा गौरव करण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची गौरवशाली परंपरा आहे. पुण्यात दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार देण्यात येणार आहे.

2001 पासून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्काराची परंपरा सुरू झाली. दरम्यान, पुरस्कार सुरू झाल्यापासून यंदा प्रथमच महिला खेळाडू शकुंतला खटावकर या पुरस्काराच्या मानकरी ठरल्या आहेत. 1979 ते 1982 कालावधीत 106 राष्ट्रीय कबड्डी लढती खेळण्याचा विक्रम शकुंतला खटावकर यांनी केला होता. खटावकर यांनी राष्ट्रीय स्पर्धेत तब्बल 8 वेळा महाराष्ट्रासाठी विजेतेपद जिंकले आहे. महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी संघटनेच्या त्या उपाध्यक्ष आहेत.

ADVT –

खुशखबर ..! – आंबोलीत ‘साप्ताहिक साहसी आणि नेतृत्व विकास शिबीर’. ; The Colonel’s Academy for Adventure & Aero sports आणि सैनिक स्कूल आंबोलीचे संयुक्त आयोजन. ..

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles