सावंतवाडी : ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे व युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित सांस्कृतिक महोत्सव 2025 च्या मुख्य रंगमंचावर आज रात्री ठीक नऊ वाजता रेकॉर्ड स्पर्धा वेशभूषा स्पर्धा व गावातील महिलांची विनोदी एकांकिका सादर होणार आहे. तसेच इतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. तरी सर्व रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



