सावंतवाडी : दुःखातून मुक्त व्हायचे असेल तर शांती आणि समाधानाची आवश्यकता असते. भौतिक गरजेतून अंतीम सुख प्राप्त होत नसते. कितीही सत्ता-संपत्ती असली तरी परम सुखाची उणीव भासते, म्हणून आध्यात्मिक आत्मोन्नती साधूनच जीवनात सुखावती म्हणजेच निर्वाण प्राप्त करता येते. त्यामुळे जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाच्या उत्क्रांतीची अवस्था म्हणजे निर्वाण असल्याचे प्रतिपादन धम्मचारी लोकदर्शी यांनी इन्सुलीतील बुध्द जयंतीच्या कार्यक्रमात केले. आज जगात सत्तेसाठी, अधिकारासाठी अराजकता आणि असामंजस्यता पसरली असून त्यातून संघर्ष निर्माण होवून युध्दाची परिस्थिती निर्माण होवू लागल्याने देशांतर्गत सामंजस्य राहण्यासाठी जगाला तथागत बुध्दांच्या शांती, करुणेची आवश्यकता असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
भीम गर्जना युवक मंडळ, इन्सुली – रमाईनगर यांच्या वतीने आयोजित समाजमंदिर येथे भगवान बुध्दांची 2569 वी जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान बुध्दांच्या व डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बुध्द पुजापाठाने झाली. यावेळी विचार मंचावर मंडळाचे अध्यक्ष धम्मचारी लोकदर्शी, सचिव अरविंद जाधव, आनंद जाधव, महिला बचत गटाच्या सविता जाधव, वृषाली जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात महीलांच्या विविध उपक्रमांचे सादरीकरण झाले. सायंकाळी सर्वांनी एकत्र बसून खीर ग्रहण करुन आनंद व्यक्त केला. जयंती कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपेश जाधव यांनी तर आभार योगेश जाधव यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिध्देश जाधव, कृष्णा जाधव, सदानंद जाधव, दिलीप जाधव, तेजस जाधव, अम्रित जाधव, संजना जाधव, अनुजा जाधव, कृतिका जाधव, सृष्टी जाधव, लैला जाधव, गिताली जाधव, ललिता जाधव, प्रज्ञा जाधव, मयुरी जाधव, सानिका जाधव, सपना जाधव, अनघा जाधव, दीक्षा जाधव यांनी विशेष सहकार्य केले.