कुडाळ : ‘कोमसाप’ सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारी मंडळाची सभा सोमवार दिनांक २ जून २०२५ रोजी सकाळी 11 वाजता कुडाळ येथील श्री देवी भद्रकाली वाचनालय गुढीपुर, पिंगुळी येथे निमंत्रित करण्यात आली आहे. तरी सर्व पदाधिकारी व सदस्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निमंत्रक मंगेश मसके (अध्यक्ष – कोमसाप सिंधुदुर्ग), तसेच सचिव विठ्ठल कदम यांनी केले आहे.



