कणकवली : सांगवे बौद्ध विकास मंडळ मुंबईचे सल्लागार व मुंबई महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता आयु.प्रकाश शंकर तांबे यांच्या मातोश्री यशोदा शंकर तांबे यांचे मंगळवार दिनांक २७/०५/२०२५ रोजी वृद्धापकाळाने सांगवे मुक्कामी निधन झाले .मृत्यू समयी त्यांचे वय ९७ वर्षे होते. सरस्वती नांदगाव हायस्कूलच्या सेवानिवृत्त शिक्षिका आयु.रेश्मा रमेश तांबे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, सून, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे ,पतवंडे असा परिवार आहे. कालकथित यशोदा तांबे यांचा जलदान विधी व शोकसभा शनिवार दिनांक ०७/०६/२०२५ रोजी त्यांच्या सांगवे आंबेडकर नगर येथील राहत्या घरी आयोजित करण्यात आला आहे. जलदान विधी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन कुटुंबीय, सांगवे बौद्ध विकास मंडळ मुंबई व गाव शाखा सांगवे यांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.



