मुंबई : मुंबई मधील टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. अनुराग जयस्वाल (वय.२९) असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मूळचा लखनऊ येथील रहिवासी होता. मागील महिन्यामध्ये त्याने टीस मध्ये ह्यूमन रिसोर्स च्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला होता.
शनिवारी (दि.२४) टीस मधील ह्युमन रिसोर्स च्या १२५ सीनियर आणि ज्युनियर मुलांची पार्टी वाशीच्या रॉयर लाँज मध्ये आयोजित करण्यात आली होती. मूळचा लखनौचा असलेला जयस्वाल शुक्रवारी रात्री वाशीतील एका हॉटेलमध्ये 150 मित्रांसह पार्टीला गेला होता. त्याच्या रूममेट्सच्या म्हणण्यानुसार, त्याने कार्यक्रमात मद्यपान केले होते. या पार्टीमध्ये सर्व सहकाऱ्यांसोबत अनुराग ही सहभागी झाला होता. तिथे तो मद्यप्राशन करुन त्याच्या सोबतच राहणाऱ्या तीन मित्रांसह चेंबूर येथे आला. पहाटे तीनच्या सुमारास ते त्यांच्या अपार्टमेंटमध्ये परतले. सकाळी जेव्हा त्याचे मित्र त्याला उठवत होते, तेव्हा तो उठलाच नाही. म्हणून त्याच्या मित्रांनी त्याला चेंबूर येथील सुश्रुत रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या प्रकरणात अति मद्यप्राशन केल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. टाटा इन्स्टीट्यूट ही नावाजलेली शैक्षणिक संस्था आहे. त्यातील विद्यार्थ्याची अशी पार्टी होणे, त्यात नशापान होणे, आणि त्या नंतर विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. आज सोमवार (दि.२६) अनुरागचे कुटुंब मुंबईत दाखल झाल्यानंतर शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
जाहिरात –