Friday, June 20, 2025

Buy now

spot_img

तीन थर लावत विद्यार्थ्यांनी फोडली दहीहंडी.! ; भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गोकुळाष्टमी उत्साहात.

सावंतवाडी :  येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये आज गोकुळाष्टमी व दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हाथी घोडा पालखी..जय कन्हैया लाल की…’ असा जयघोष, श्रीकृष्ण-राधा यांची विद्यार्थ्यांनी केलेली वेशभूषा, दहीहंडी फोडण्यासाठी बालगोपाळांकडून लावले जाणारे थर अशा उत्साहाच्या वातावरणात हा उत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात मुलांनी मनमुराद आनंद लुटला. ‘गोविंदा आला रे आला……’ या गाण्यावर विद्यार्थ्यांनी नृत्याचा आनंद घेतला. शाळेच्या विद्यार्थ्यांच्या पथकाने तीन थर लावत दहीहंडी फोडताच विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त राधा कृष्णाची वेशभूषा करून विद्यार्थी या उत्सवात सहभागी झाले होते. कार्यक्रमात नर्सरी ते दहावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. यावेळी आकर्षक वेशभूषा करत शाळेच्या विद्यार्थिनींनी नृत्ये सादर केली. त्याला सर्व विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. दहीहंडीचे आयोजन क्रीडा शिक्षक सचिन हरमलकर, संदीप पेडणेकर व मुख्याध्यापिका प्रियांका देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles