मालवण : जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग व मालवण तालुका क्रीडा समिती यांच्या वतीने डॉ. दत्ता सामंत हायस्कूल, देवबाग येथे घेण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये असरोंडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सर्व गटात यश मिळवत भरीव कामगिरी केली आहे.
गेली अनेक वर्षे बुद्धिबळ स्पर्धेमध्ये असरोंडी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरावरीही आपली चमकदार कामगिरी दाखवत यश प्राप्त केलेले आहे. मालवण तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये असरोंडी हायस्कूलचा विद्यार्थ्यांनी पुढील प्रमाणे वेगवेगळ्या गटात बाजी मारली आहे
17 वर्ष मुली
अस्मिता अभिमन्यू सावंत – प्रथम
17 – वर्ष मुले
दिवेश तुकाराम बाणे – प्रथम
19 वर्षे मुली
वैष्णवी प्रदीप परब – द्वितीय
14 वर्षे मुली
रिया जनार्दन कोकरे- चतुर्थ
14 वर्ष मुले
प्रतीक अनिल घाडीगावकर – पाचवा
या सर्व विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा क्रीडा संकुल सिंधुदुर्ग नगरी येथे 5 सप्टेंबर 2024 ला होणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक सुधीर सावंत व प्रशालेचे क्रीडाशिक्षक कमलेश गोसावी यांचे मार्गदर्शन लाभले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन होत आहे.
ADVT –