भारतातील पहिला जलपर्यटन प्रकल्प सिंधुदुर्गात, उद्या मुहूर्तमेढ सोहळा होणार संपन्न.! ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणार प्रकल्प.

सावंतवाडी : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निवती येथील समुद्र तळाशी स्थापित होणाऱ्या भारतातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाचा मुहूर्तमेढ सोहळा उद्या संपन्न होणार आहे. मंत्रालय मुंबई येथून उद्या दिनांक १० जून २०२५ वेळ दुपारी १२ वाजता ऑनलाईन पद्धतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांनी दिली.

यावेळी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पालकमंत्री नितेश राणे मंत्री, खासदार नारायण राणे यांची मुख्य उपस्थिती राहणार आहे. तसेच आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच अतुल पाटणे प्रधान सचिव (पर्यटन), डॉ. बी.एन.पाटील (भा.प्र.से.) संचालक, पर्यटन संचालनालय, डॉ. माणिक दिवे मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सिंधुदुर्ग, मनोजकुमार सुर्यवंशी (भा.प्र.से.) व्यवस्थापकीय संचालक, अनिल पाटील (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग, मोहन दहिकर (भा.पो.से.) जिल्हा पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांची उपस्थिती राहणार आहे‌. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन संजय ढेकणे, क्षिप्रा बोरा,
दिपक माने आदी अधिकारी वर्गाने केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles