प्रेरणादायी – सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सरिता मुननकर यांनी घातला ‘आदर्श’, केला नेत्रदानाचा संकल्प. ; सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्गच्या वतीने ‘जागतिक दृष्टीदान दिन’ साजरा.

संजय पिळणकर –

सावंतवाडी : सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या सस्थेच्या वतीने मंगळवार दि. १० जून रोजी ‘जागतिक दृष्टीदान दिन’ सावंतवाडी येथे शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यावेळी ‘जागतिक दृष्टीदान’ दिनाचे औचित्य साधून सावंतवाडी – भटवाडी येथील निवृत्त केंद्रप्रमुख श्रीमती सरिता सुरेश मुननकर यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला. तसा फॉर्म भरून त्यांनी संस्थेकडे सुपूर्द केला.
श्रीमती सरिता मुननकर यांनी वयाच्या १८ व्या वर्षी शिक्षिका म्हणून ज्ञानदानाच्या कार्यास सुरुवात केली. त्यांनी तब्बल ४० वर्षे जिल्हा परिषदेच्या सेवेत असताना शिक्षक, पदवीधर शिक्षक, अपग्रेड मुख्याध्यापिका ते केंद्रप्रमुख अशा सेवा बजावल्या आहेत.
यावेळी ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर, सिंधुरक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग या संस्थेचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष सुनील राऊळ, जिल्हा उपाध्यक्ष महेश राऊळ, सावंतवाडी – दोडामार्ग विभागीय अध्यक्ष संजय पिळणकर, वेंगुर्ला उपाध्यक्ष सौ. समृद्धी पिळणकर, सल्लागार सुधीर पराडकर, कार्याध्यक्ष दीपक तारी, सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, माजी निवृत्त केंद्रप्रमुख श्रीम. सरिता सुरेश मुननकर, ज्येष्ठ पत्रकार उत्तम वाडकर, अभिमन्यू लोंढे, सैनिक स्कूल आंबोलीचे सहाय्यक शिक्षक परमेश्वर सावळे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे व्यवस्थापक लक्ष्मण आरोसकर, दीनानाथ बांदेकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles