आम्ही राज साहेंबाबद्दल बोलणार नाही फक्त… ; शिंदे गटाची भूमिका काय?

मुंबई : सरकारने त्रिभाषा सूत्राचे दोन्ही जीआर रद्द केल्यानंतर शनिवारी मुंबईत विजयी मेळावा पार पडला, या मेळाव्याला दोन्ही ठाकरे बंधू शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची उपस्थिती होती. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गट आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

राज साहेब ठाकरे यांच्यावर किंवा त्यांच्या विरोधात बोलण्याचा विषय काय येतो? ना कुठला पक्ष, ना कुठला झेंडा अशी त्यांची भूमिका होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ती, मराठी भाषा सोडून खालच्या पातळीची टीका केली. मुंबई महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी भाषण केलं. उद्धव ठाकरे हे हारलेले दिसून आले. राज ठाकरे आमच्याबद्दल काही बोलले नाहीत म्हणून, आम्ही त्यांच्याबद्दल काही बोलणार नाही.  मात्र उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आम्ही बोलत राहू, असं मस्के यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles