आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस १६ जुलैला सावंतवाडीत होणार.

सावंतवाडी : राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा १८ जुलै रोजीचा वाढदिवस यंदा १६ जुलै रोजी सावंतवाडी येथे साजरा होणार आहे. शिवसेना आणि आमदार दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती शिवसेना शहर प्रमुख बाबू कुडतरकर यांनी दिली. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर कुडतरकर बोलत होते.

श्री. कुडतरकर पुढे म्हणाले की, आमदार केसरकर १६ जुलै रोजी सायंकाळी ७ ते १० या वेळेत सावंतवाडी येथील गोविंद चित्र मंदिर येथे कार्यकर्त्यांना आणि शुभचिंतकांना भेटून शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

आमदार केसरकर यांच्या वाढदिवसाच्या दिवशी ते शासकीय कामांमध्ये व्यस्त असणार असल्याने, वाढदिवस दोन दिवस अगोदर साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांनी पुष्पगुच्छ किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नये, केवळ गुलाब पुष्प आणल्यास चालेल, असे आवाहन बाबू कुडतरकर यांनी केले आहे. तसेच, शुभेच्छा कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी नगरसेविका शर्वरी धारगळकर, दिपाली सावंत, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, ललिता सिंग, संजय गावडे, अर्चित पोकळे, सुजित कोरगावकर, प्रकाश बिद्रे, विश्वास घाग, विनोद सावंत, एकनाथ हळदणकर, दत्ता सावंत, शैलेश मेस्त्री, बबन शेळके, विनायक म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles