सामाजिक कार्यकर्ते संतोष गांवस यांच्या मातोश्री श्रीमती साधना गांवस यांचे निधन!

सावंतवाडी : सालईवाडा येथील रहिवासी आणि साधना टेलरिंग क्लासेसच्या संस्थापिका श्रीमती साधना सुभाष गांवस (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांनी आज पहाटे सालईवाडा येथील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.
श्रीमती साधना गांवस या स्वातंत्र्यसैनिक कै. मारुती चिटणीस यांच्या कन्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातू आणि नात असा परिवार आहे. त्या लक्ष्मण उर्फ संतोष गांवस यांच्या मातोश्री तर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे सहसचिव विनायक गांवस यांच्या आजी होत.
आज शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles