सुप्रसिद्ध दानशूर उद्योजक पुष्कराज कोले यांची सुरंगपाणी केंद्रशाळेला सदिच्छा भेट!

सावंतवाडी : सोमवार दिनांक 28 जुलै 2025 रोजी सुप्रसिद्ध उद्योजक तथा दानशूर व्यक्तिमत्व पुष्कराज कोले यांनी जिल्हा परिषद केंद्रशाळा वायंगणी सुरंगपाणी शाळेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी अंगणवाडी व इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तू व खाऊचे वाटप केले. तसेच शिक्षकवृंद व इतर कर्मचारी, उपस्थित पालक यांनाही भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

शाळेच्या प्रगतीच्या शिरपेचात यशाचा तुरा रोवून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या कुमार गौरांग मिलिंद पंडित, कुमार गौरांग दीपक राजापूरकर , कुमारी रिया गोविंद पेडणेकर यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन विशेष सन्मान केला.
आईवडील,शिक्षक व समाज हे आपले आद्यगुरू आहेत.त्यांना कायम स्मरणात ठेवा. अभ्यासात सातत्य ठेवा. असे बहुमोल मार्गदर्शन त्यांनी चिमुकल्यांना केले व प्रगतीच्या दिशेने झेप घेणाऱ्या केंद्रशाळा सुरंगपाणी शाळेला पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. शामल मांजरेकर – पिळणकर यांनी केले. यावेळी व्यासपिठावर समीर कोले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमित कोरगांवकर, उपाध्यक्षा सौ. वैष्णवी पेडणेकर , शिक्षणप्रेमी तथा माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण राजापूरकर व शिक्षकवृंद उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles