बास्केटबॉल ज्युनिअर राज्य स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्हा निवड चाचणी मालवण येथे २ ऑगस्ट रोजी होणार.

मालवण : महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल असोसिएशन आयोजित व पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन यांच्या नियोजनात श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे दिनांक ९ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२५ रोजी ७५ व्या ज्युनिअर मुले व मुली बास्केटबॉल राज्य स्पर्धा होणार आहेत.
या राज्य स्पर्धेत सहभागी होणार्या संघाच्या निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनने श्री सद्गुरु सदानंद माऊली एज्युकेशनल फाउंडेशन संचलित डॉ. श्रीधर सिताराम कुडाळकर हायस्कूल मालवणच्या बास्केटबॉल मैदानावर शनिवार दिनांक २/८/२०२५ रोजी सायंकाळी चार वाजता निवड चाचणीचे आयोजन केले आहे.
ज्या खेळाडूंची जन्म तारीख ०१/०१/२००७ नंतरची असेल अशा खेळाडूंना या निवड चाचणी मध्ये सहभागी होता येईल…
निवडचाचणी साठी येताना खेळाडूंनी सोबत आधार कार्ड व जन्म प्रमाणपत्र (ओरीजिनल) सोबत घेऊन यावे.
निवडचाचणी मध्ये जिल्ह्यातील बास्केटबॉल खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाण्याचे आवाहन अध्यक्ष श्री सुरेंद्र सकपाळ यांनी केले आहे, अधिक माहितीसाठी सचिव श्री अजय शिंदे (९४२२३९४१८६ ) यांच्याशी संपर्क साधावा.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles